Posts

20 जानेवारी ला गोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा

Image
मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील बंजारा समाजाच्या एका युवतीवर बळजबरी अत्याचार करुन विहीरीत ढकलून दिल्याने गतप्राण झालेल्या युवतीला न्याय मिळावा यासाठी बंजारा समाजातील अग्रगण्य असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात येत्या शुक्रवार २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे. प्रा. संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात क्रुषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत असून वाशीम जिल्हातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण गोरबंजारा तांड्यामधून गोरसेनेचे किमान एक ते दिड लाख कार्यकर्ते तथा सर्व समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मागील वर्षी सुद्धा गोरसेनेच्या वतीने पुसद येथे काळी दौलतच्या शाम राठोड हत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात जनसंख्येत लाखोंचा मोर्चा काढला होता. त्यावेळी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. आता यावेळी सुद्धा पिडीत मुलीला न्याय मिळण्यासाठी गोरसेनेच्या वतीने वाशीममध्ये जन आक्रोश महामो

अवघ्या पाच फूट अंतरावर बिबट्या वर साधला अचूक निशाणा, ट्रॅक्यूलाईज करून बिबट्याला केले जेरबंद

Image
अवघ्या पाच फूट अंतरावर बिबट्या वर साधला अचूक निशाणा, ट्रॅक्यूलाईज करून बिबट्याला केले जेरबंद अमरावती जिल्ह्यातील वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पोहरा गावा जवळील अनंतराव तायडे यांच्या शेता मध्ये एक बिबट गेल्या आठ दिवसापासून वास्तव्यास होता सदर बिबट्याने अनेकदा लहान बकऱ्यांची शिकार सुद्धा केली होती याबाबत अमरावती रेस्क्यू टीमला माहिती मिळताच त्यांनी आज सकाळी सदर बिबट्याला ट्रॅक्यूलाईज करून रेस्क्यू केले,  मिळालेल्या माहितीवरून पोहरा गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल आहे, या जंगलातील हा बिबट असून अन्नाच्या शोधात गावाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये त्यांनी आपले वास्तव्य निर्माण केले असल्याचा अंदाज वन विभागातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. आज पहाटे बिबट्या हा शेतामध्ये असल्याची माहिती अमरावती रेस्क्यू टीमचे शूटर वनपाल अमोल गावनेर यांना मिळाली, सदर ठिकाणी शेतामध्ये गहू पेरलेले असल्यामुळे या ठिकाणी वाहन जाणे शक्य नव्हते त्यामुळे स्वतः पैदल जात बिबट्याच्या अगदी जवळून शूटर अमोल गावणेर यांनी ट्रॅक्यूलाईज करीत बिबट्याला बेशुद्ध केले. त्या पक्षात वन विभाग व पशुवै